Crime News | मुंबईतील वरळीत धक्कादायक घटना घडलेली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलीस शिपायाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलेलं आहे. प्रेयसीला मेसेज आणि फोटो पाठवून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे.
इंद्रजित साळुंखे (वय. २७) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. इंद्रजित हा LA Section 1 मध्ये कार्यरत होता. रविवारी (दि. 19) रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं त्यानं हे धक्कादायक कृत्य केलेलं आहे. इंद्रजितचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झालेले होतं. त्यानंतर त्याने तिला दादरला सोडले आणि तेथून तो वरळीला आला. तेथून त्याने प्रेयसीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज आणि फोटो पाठवला.
Spiritual news | ही आहे शनिदेवाला प्रिय राशी; असे करा शनिदेवाला प्रसन्न
त्यानंतर इंद्रजितने हे पाऊल उचललं आहे. या घटनेची नोंद वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पुढिल पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम