Crime news | रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये सापडली मृत नवजात बालिका

0
26
Crime news
Crime news

Crime news |  मुंबईच्या सायन ह्या रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून, ह्या प्रकरणामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एका नवजात बालिकेचा मृतदेह ह्या सायन रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी जन्मत:च मुलीला ह्या रुग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्याच्या पेटीत फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.(Crime news)

ह्या नवजात बालिकेचा मृतदेह हा टॉयलेटमध्ये सापडल्याचे समजताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले.  आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने धाव घेत तात्काळ ह्या बालिकेची तपासणी केली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. दरम्यान, यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्या नवजात बालिकेला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच  संबंधित अनोळखी महिलेच्या विरोधात सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता ह्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Jalgaon crime | पोटच्या मुलानेच निर्घुणपणे जन्मदात्याला संपविले

अधिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना (दि. ८ डिसेंबर) रोजी घडली असून, सायन येथील लोकमान्य टिळक ह्या  रुग्णालयातील काम करणाऱ्या सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायन पोलिसांनी गुन्हा या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डोंगरे ह्या त्या दिवशीही नेहमीप्रमाणे कामावर गेल्या असताना, सकाळी पावणे सातच्या दरम्यान सायन येथी लोकमान्य टिळक रुग्णालयातील अपघात विभागाच्या टॉयलेटमधील कचरा गोळा करण्यासाठी त्या गेल्या होत्या.

पण, तेव्हा त्यांना तिथे असलेली कचऱ्याची बादली ही नेहमीपेक्षा खूपच जड जाणवली. म्हणून त्यांनी ती कचऱ्याची बादली उघडून बघितली असता, त्यात एक काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवी फार जड वाटली.

Nashik Crime | वणी पोलिस ठाण्यात संशयिताची पोलिसाला धक्काबुक्की

ती पिशवी उघडून बघितली असता, समोरचे दृश्य पाहून त्या धक्काच बसला. त्या पिशवीत एक नवजात अर्भक असल्याचे त्यांना आढळले. दरम्यान, त्यांनी ह्या गोष्टीची माहिती तात्काळ रुग्णालय वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्या रुग्णालयातील डॉक्टर आले असता, त्यांनी त्या नवजात बाळाला बाहेर काढले व तिची तपासणी केली. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, त्या नवजात बालिका ही मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने ह्या घटनेची माहिती शीव पोलिसांना दिली होती. ह्या नवजात मुलीचा कोणी घातपात झालाय का?  तो कोणी केला? यामागे काय कारण आहे आणि कोणत्या कारणासाठी हा घातपात केला? हे अद्याप ही स्पष्ट झालेलं नसून, याप्रकरणी शीव पोलिसांनी संबंधित अनोळखी महिलेच्या विरुद्ध तक्रार दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here