Crime News | हिरे महाविदयालय – पंचवटी कॉलेज या संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत 10 लाख रुपये घेतल्याची तक्रार उत्तम काळु चौधरी यांनी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चार जणांविरोधात दाखल करण्यात आलेली आहे. हिरे महाविदयालय – पंचवटी कॉलेज या संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत 10 लाख रुपये घेतल्याची तक्रार माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह नोकरी लावून देण्याचे आमिष देवून इसम नामे कल्पेश प्रभाकर बोरसे, दिपक झिप्पु चव्हाण, अमर रामराजे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात हिरे यांच्यासह चारही संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
Satana | आमदार दिलीप बोरसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
तक्रारीत म्हटले आहे की,
माझे नाव उत्तम काळु चौधरी, वय-64 वर्ष, व्यवसाय-रिटायर, (रा. पिपंळगाव खांब, नाशिक) फिर्यादी कल्पेश बोरसे मला म्हणाले कि, “माझी हिरे महाविदयालय – पंचवटी कॉलेज या संस्थेत ओळख असुन, सध्या तेथे जागा निघाल्या आहेत. तिथे मी तुमच्या मुलाचे काम करून देतो” असे सांगण्यात आले. काही काळानंतर मी आणि माझा मुलगा- ऑफिस खाली आले असता तेथे दिपक झिनु चव्हाण हे मला म्हणाले की, लाख रुपये पहीले दया उरलेले पैसे काम झाल्यावर दया.असे सांगितले गेले. ते वांरवार पैशाची मागणी करू लागल्यामुळे त्याने मला शिवीगाळ करून काय करायचे ते करून घ्या तुमला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यांची मोठमोठ्या ठिकाणी ओळख असल्याने मी त्यांच्या विरुध्द कोठेही तक्रार केलेली नाही.
Big News | सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
माझे पैसे मला परत मिळत नसल्याने मला खुप मानसिक त्रास होवु लागलेला आहे. यावरून माझी फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने कल्पेश प्रभाकर बोरसे आणि दिपक झिप्पु चव्हाण, अमर रामराजे, अपूर्व हिरे यांच्यावर कारवाई करत मी उपनगर पोलीस ठाण्यास तक्रार दिलेली आहे. तरी, जानेवारी 2017 ते मार्च 2023 दरम्यान माझा मुलगा दीपक याला नोकरी लावून देण्याचे आमिष देवून इसम नामे कल्पेश प्रभाकर बोरसे, दिपक झिप्पु चव्हाण, अमर रामराजे, अपूर्व हिरे यांनी माझा विश्वास संपादन करून नोकरी लावून देण्यासाठी 10 लाख रूपये घेवून माझी फसवणुक केली म्हणुन त्यांच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद करत आहे.
अपूर्व हिरे यांच्याविरोधात यापुर्वी देखील असाच एक गुन्हा झाला होता दाखल
महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत 28 लाख रुपये घेतल्याची तक्रार महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी तथा माजी आ. अपूर्व हिरे यांच्यासह चार जणांविरोधात दाखल करण्यात आली होती. सटाणा पोलिस ठाण्यात हिरे यांच्यासह चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच एका संशयिताला अटक करण्यात आली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम