धक्कादायक! मुलीनं प्रियकराशी लग्न करु नये म्हणून कुटुंबीयांचा अघोरी प्रकार

0
30

Crime News | कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील एक अजब प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलीचे प्रेम संबंध असलेल्या तरुणाशी लग्न होऊ नये यासाठी जादूटोणा आणि अघोरी प्रकार अवलंबल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याप्रकरणी राहुल पोवार यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार भोंदू बाबासह तिघांविरोधात आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भोंदूबाबा आणि  रेश्मा बुगडे, शामराव बुगडे,  सुनील निऊंगरे कागिनवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या लोकांची नावे आहेत. (धक्कादायक)

Crime news | यात्रेत मजा करण्यासाठी केली चोरी…

मलिग्रे तालुका आजरा येथील राहुल पवार, रेश्मा बुगडे, शामराव बुगडे हे एकाच गावातील रहिवासी असून राहुल या मुलाचे आणि बुगडे यांच्या मुलीचे गेले दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. याबाबत दोघांच्याही घरी सर्वांना संपूर्ण माहिती होती. संबंधित मुलीचा प्रियकर राहुल आणि त्याचे नातेवाईक हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह लग्नाची मागणी घालण्यासाठी बुगडेंच्या घरी गेले होते. त्यांनी बुगडे यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र त्याला मुलीच्या घरच्यांनी नकार दिला होता.

दरम्यान, मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी सुनील निऊंगरे ह्या एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोण्याचा प्रकार करू लागले. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचे फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले होते. यावेळी राहुल काय पुरले आहे हे पाहण्यासाठी गेला असता तेथे आपला फोटो आणि बुगडे यांच्या मुलीचा फोटो लिंबू आणि चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंड आणि  दारू ठेवल्याचे निदर्शनास आले.

Crime news | चक्क..! किल्ला नावावर करण्याची तयारी…

त्यानंतर पुन्हा २८ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे यांनी मरगुबाई मंदिराच्या बाजूला जंगलात जिवंत कोंबडी, अंड आणि एक काळे-बावळे झाडावर मोळा मारून लटकवलेले आढळले. यावर राहुल याने आजरा पोलिसात जाऊन संबंधितावर तक्रार नोंदवली. यानुसार भोंदूबाबा आणि चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील अधिक तपास करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here