मुंबई : कॉल सेंटरच्या माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेचे युनिट XI एका सेक्स रॅकेटच्या व्हिडिओ आणि फोन कॉल्सच्या प्रकरणाचा तपास करत होते आणि संपूर्ण रॅकेट चालवण्यासाठी कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई क्राईम ब्रँचने कॉल सेंटरद्वारे चालवले जाणारे मोठे ऑनलाइन सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेचे युनिट XI एका सेक्स रॅकेटच्या व्हिडिओ आणि फोन कॉल्सच्या प्रकरणाचा तपास करत होते आणि संपूर्ण रॅकेट चालवण्यासाठी कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह काही महिलांची सुटका करण्यात आली असून कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सेक्सटोर्शन लिंक शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम