Crime | धक्कादायक! आइसक्रीम घेण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला पिशवीत

0
15

Crime | वसई येथून अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिशवीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजलेली आहे. मृत मुलगी शुक्रवारी (दि. ०१) सायंकाळी आईस्क्रीम घेण्यासाठी घेण्यासाठी घरातून बाहेर निघाली मात्र, बराच उशीर होऊनही ती घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. घरातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच सोमवारी(दि. ०४) परिसरातील एका रिकाम्या खोलीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केलेली आहे.

Crime News | विवाहीत प्रेयसीचे नग्न फोटो काढून उकळले 17 लाख; प्रियकराला अटक

मृत मुलगी वसई येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी असून शुक्रवारी शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून ती घराबाहेर खेळायला गेली होती. आइसक्रीम घेण्यासाठी तिने तिच्या वडिलांकडून ५ रुपये घेतले मात्र बराच उशीर होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पेल्हार पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. तिची आई आणि भाऊ त्यांच्या गावी गेलेले होते. मुलीचा शोध घेण्यासाठी कुटुबियांनी आजूबाजुला मुलीचे फोटो आणि तिच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

या दरम्यान, मुलगी राहत असलेल्या जवळच्या चाळीतील ५ क्रमांकाच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचा पोलिसांना सोमवारी (दि. ०४) सकाळी फोन आला आणि यानंतर पेल्हार पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलिसांनी खोलीत प्रवेश केला असता मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला तसेच तिचे पाय पट्ट्याने बांधून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा मृतदेह संबंधित मुलीचा असल्याचा स्पष्ट झालेले आहे.

Spiritual news | असे आहे कालभैरव जयंतीचे महत्त्व; वाचा सविस्तर

ज्या खोलीत मृतदेह सापडला त्या खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आलेले होते. मालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल. या खोलीला बहुतांशी कुलूप असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोलिसांना संशय आहे की, कोणीतरी मुलीवर पाळत ठेऊन तिला जबरदस्तीने खोलीत नेले होते. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर लैंगिक शोषण झाले की नाही? हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here