Crime : चक्क त्यांनी कुरियर ने पाठवल्या तलवारी…

0
23

Crime : अंबड पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे. यामध्ये कुरियरने आलेल्या जवळपास सहा तलवारी अंबड पोलिसांनी जप्त केल्या असून याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,
हरियाना राज्यातील सोनिपथ येथुन कोपरगाव येथे कुरियर ने पाठविण्यात आलेले सहा तलवार चे पार्सल अंबड पोलिसांनी अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईन्ट येथील एका कुरियर च्या कार्यालयातुन जप्त केले असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
या बाबत पोलिसांनी माहिती दिली की, हरियाना सोनीपथ येथुन कोपरगाव येथे सहा तलवार चे पार्सल येणार आहे, सदर पार्सल प्रथम नाशिक अंबड एमआयडिसी वसाहत परिसरातील गरवारे पॉईन्ट येथील एका कुरियर च्या कार्यालयात येणार असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली.

https://thepointnow.in/ch-sambhajinagar-car-accident/

दरम्यान अंबड पोलिस ठाण्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस नाईक समाधान चव्हाण, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे आदींनी कुरियर कार्यालयास भेट दिली व सहा तलवार असलेले पार्सल जप्त केले. सदर पार्सल नाशिक येथुन कोपरगाव येथे जाणार होते या प्रकरणी अंबड पोलिसांनी कोपरगाव येथील संशयित सचिन मोरे व हरियाना सोनीपथ येथुन तलवार पाठविणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास अंबड पोलिस करत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here