मुंबई : पोटनिवडणूक मोठ्या नाट्यमय वळणावर आली असून सुरवातीपासूनच आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वेळोवेळी यंत्रणा ठाकरेंची अडवणूक करत असून कोर्टात ठाकरे जिंकतात तर यंत्रणेत शिंदे असे चित्र सद्या निर्माण झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला असून शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यामुळे आयुक्तांना चांगलेच फटकारले असून ऋतुजा लटके यांचा राजीनामा आता महापालिकेला मंजूर करावा लागणार आहे.
राजीनामा मंजूर होत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली अन् त्याठिकाणी मोठा विजय हा ठाकरे गटाचा झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टात लटके यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करताना म्हटले की, राजकीय दबावापोटी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही. राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला असून त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला.
महापालिकेने कुठलेही पूर्वसूचना एक महिना दिली नाही नंतर राजीनामा फेटाळण्यात आल्याचे सांगितले, यानंतर 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली. नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे लटके यांनी पुन्हा राजीनामा दिला मात्र एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्याचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत महापालिकेला कोर्टाने फटकारले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम