Couple Suicide | ‘प्रेम’ कळायच्या आधीच अल्पवयीन प्रेमी युगुलांनी एकत्रच संपवले आयुष्य

0
45
Couple Suicide
Couple Suicide

Couple Suicide |    राज्यात सध्या आत्महत्येचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून, यात प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश असतो. यामगे याने कारणं असतात, पण बहुतेक वेळी हे प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलले जाते. राज्यात प्रेम प्रकरणातून घरातून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्याही मोठी आहे. दरम्यान, प्रेम म्हणजे काय? हेदेखील ज्या वयात त्यांना कळलेलं ही नसतं, अशा वयात ही अल्पवयीन प्रेमीयुगुलं ही काही टोकाची पाऊले उचलतात.

अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ह्या तालुक्यातील शेंदुर्जन या भगत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणासह एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून गळफास घेत स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Couple Suicide)

Shocking news | पोटच्या तरुण मुलीसाठी बापच नाही तर आईही ठरली वैरीन

दरम्यान, ह्या दोघं प्रेमी युगुलांनी सोबतच झाडाला गळफास घेत त्यांचे आयुष्य संपवले आहे. ह्या घटनेमुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेडा ह्या गावाजवळ असलेल्या सूतगिरणी जवळील परिसरात ह्या दोघं प्रेमी युगुलांचे मृतदेह हे एका झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. तब्बल मागील चार दिवसांपासून हे दोघे घरतून पळून गेले होते तसेच दोघे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime | भाडेकरुनेच केला घात; ६ वर्षे अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

नेमकं प्रकरण काय..? | (Couple Suicide)

दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ह्या दोघांपैकी तरुण हा २२ वर्षीय तरुण गोपाल खिल्लारे साखरखेर्डा  गावातील रहिवासी असून, याचे त्याच्याच गावातील एका १४ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे हे दोघेही तब्बल चार दिवसांपासून घरातून पळून गेले असून, बेपत्ता होते. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिलेली होती. दरम्यान, ह्या दोघांचे मृतदेह हे शेंदुर्जन या भागातील सुतगिरणी परिसरात एका झाडाच्या फांदीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.(Couple Suicide)

दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच ते सुतगिरणी परिसरातील घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. तसेच ह्या घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर संबंधित दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी दोघे मृतांपैकी आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव हे गोपाल खइल्लारे ( वय – २२ ) असे असून, हे दोघेही शेंदुर्जन येथील रहिवासी आहेत. (Couple Suicide)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here