Coronavirus | कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढलं असून, यामुळे आता नागरिकांची चिंता वाढली आहे. जगभरात कोरोनाच्या ओमयक्रॉन या व्हेरियंटचे दोन नवे सब-व्हेरियंट आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. तर, या सब-व्हेरियंटला ‘फ्लर्ट’ हे नाव दिले आहे. दरम्यान, या नव्या फ्लर्ट व्हेरियंटमुळे देशात पुन्हा कोरोनाचा नव्याने उद्रेक होण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काय आहे हा नवा फ्लर्ट व्हेरियंट आणि त्याची लक्षणे (Corona New Variant FLiRT Symptoms) हे जाणून घेऊयात…
Coronavirus | KP.2 व्हेरियंट महाराष्ट्रात सर्वाधिक
तर भारतात KP.2 या व्हेरियंटचे एकूण २९० रुग्ण आढळून आले असून, यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोणत्या राज्यात किती रुग्ण – महाराष्ट्र – १४८, दिल्ली – १, गोवा – १२, गुजरात – २३, हरियाणा – ३, कर्नाटक – ४, मध्य प्रदेश – १, ओडिशा – १७, राजस्थान – २१, उत्तर प्रदेश – ८, उत्तराखंड – १६, पश्चिम बंगाल – ३६ रुग्ण आढळले आहेत. (Coronavirus)
Corona Update | त्र्यंबकेश्वर, सिन्नरपाठोपाठ शहरातही कोरोनाचा वाढतोय कहर!
KP.1 व्हेरियंटचे कोणत्या राज्यात किती रुग्ण?
देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या भारतीय INSACOGच्या डेटानुसार, KP.1 या नव्या व्हेरियंटचे आतापर्यंत एकूण ३४ रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यापैकी २३ रुग्ण हे एकट्या पश्चिम बंगालमध्ये तर, एक गोवा – १, गुजरात – २, महाराष्ट्र – ४, राजस्थान – २, आणि उत्तराखंड – १ या राज्यात रुग्ण आढळले आहेत.
अशी आहेत फ्लर्ट कोरोना व्हेरियंटची लक्षणे
सामान्य कोविड विषाणूची लक्षणे ही ताप, खोकला आणि थकवा ही आहेत. तर, यात काही व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो. घसा दुखणे, नाक बंद होणे, नाक वाहणे अशी श्वसनाशी संबंधित अनेक लक्षणे आहेत. तसेच काही रुग्णांना चव न येणे, वास कमी होणे, असेही जाणवते. (Coronavirus)
गेल्या काही महिन्यांत कोविड रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे आढळली. यात मळमळ, उलट्या, अतिसार ही प्रमुख लक्षणे आढळली. तर, स्नायू किंवा अंग दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे हीदेखील लक्षणे आहेत. रुग्णांसाठी या लक्षणांची तीव्रता वेगवेगळी आहेत. तर, काहींना सौम्य ते गंभीर लक्षणे आहेत. तर, काहींना लक्षणे नाहीत.
Nashik Corona | नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोनाचे तीन शिकार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम