Corona News | सध्या संपूर्ण जगासह भारतातही कोरोनाचा JN.1 हा नवा सब व्हेरिएंट दाखल झाला असून, ह्या व्हेरिएंटने देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात JN.1 ह्या सब व्हेरिएंटने बाधितांची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यातील आरोग्य यंत्रणांना सावध राहण्याचे निर्देश दिले आहे. (Corona News)
कोरोना विषाणूच्या ह्या नव्या व्हेरिएंटमुळे आता कोविड लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे याचे संशोधन होत आहे. दरम्यान, याची आवश्यकता भासल्यास हा चौथा डोस कधी दिला जाणार याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. यामुळे सध्याची देशातील परिस्थिती आणि वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता. सरकारने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
Corona News | कोरोनाच्या नव्या व्हेरीऐंटमुळे आवाज जाणार..?
देशभरात हिवाळा ह्या ऋतुसोबतच कोरोनानेही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. नवीन JN.1 हा सब व्हेरिएंट हा ओमिक्रॉन चाच उपप्रकार आहे. दरम्यान, आधी सिंगापूर ह्या देशात JN.1 आढळला आणि त्यानंतर तो चीन, अमेरिका, भारत अशा तब्बल ४० पेक्षा अधिक देशात पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘इंटरेस्ट ऑफ व्हेरिएंट’ असे नाव दिले असून, याबाबत अधिक चिंता व्यक्त केली आहे. नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट नवी लस तयार करीत आहे. (Corona News)
खरंच चौथ्या डोसची गरज आहे? |(Corona News)
‘देशात कोरोनाच्या JN.1 ह्या सब व्हेरिएंटचा वाढत प्रभाव हा असून, ज्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास असेल, त्यांनी तातडीने लसीचा तिसरा डोस घ्यावा. दरम्यान, सध्या तरी परिस्थिती बघता कोरोना लसीच्या चौथ्या बूस्टर डोसची गरज नसून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच नियमांचे पालन करावे असा सल्ला शस्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. JN.1 हा ओमिक्रॉनचा नवीन सब व्हेरिएंटचा प्रसार होत असून, यामुळे खूप अनेक देशांमध्ये रुग्ण संख्या ही वाढत आहे. दरम्यान, भारतात याचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसला नाही. त्यामुळे सध्या तरी स्थिती नियंत्रणात आहे.
Corona Alert | वाढत्या कोरोनामुळे पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला..!
अशी आहेत JN.1 ची लक्षणे
लक्षणांबद्दल माहिती समोर आली असून, JN.1 च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, आणि तीव्र वेदना ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आधीच राज्यांना सतर्क राहण्याच्या निर्देश दिलेले आहेत. तसेच, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास पुढील नमुने हे केंद्राकडे पाठवण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच, कालपर्यंत देशात एकाच दिवसांत ६५६ इतके कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ३,७४२ वर पोहोचली आहे.(Corona News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम