Political News : राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्याचबरोबर पक्षांतराच्या बातम्या रोज बाहेर येत असतात. याच पार्श्वभूमीवर आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते जितेश अंतापुरकर आणि झिशान सिद्दिकी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जितेश अंतापुरकर आणि झिशान सिद्दिकी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती माध्यमांशी बोलताना जाहीर केली. या कारवाईनंतर जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची तर झिशान सिद्दिकी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे आता बोलले जात आहे.
विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांतील काँग्रेसची काही मते फुटली होती. यावरून जितेश अंतापुरकर व काही नेते काँग्रेसच्या हाय कमांडच्या रडारवर होते. त्यामुळे याच प्रकरणावरून जितेश अंतापुरकरांची काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे झिशान सिद्दीकींनी “अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून जर ते एखादे चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतुक करणे आणि आभार मानणे ही आपली जबाबदारी आहे.” असे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर अजित पवारांच्या मुंबई येथील आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत हजेरी देखील लावली होती.
BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार
Political News | अंतापुरकर आणि अशोक चव्हाण निकटवर्तीय
जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अंतापुरकर ही भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले. त्याचबरोबर विधानपरिषद निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. त्यानंतर आता काँग्रेसकडून अंतापुरकरांची हकालपट्टी करण्यात आली असून ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम