Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

0
24
Igatpuri Constituency
Igatpuri Constituency

Congress | काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, आज ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. या राजकीय भूकंपानंतर आणखी एक राजकीय खळबळ उडवणारी बातमी नाशिकमधून समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील नॉट रीचेबल असल्याने आता ते देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता आमदार हिरामण खोसकर यांच्या कार्यालयातून एका कथित पत्राद्वारे या चर्चांबाबत खुलासा करण्यात आला आहे.(Congress)

Congress | काय आहे पत्रात..?

राज्य सरकारच्या वतीने गेल्या ५ फेब्रुवारीपासून काँग्रेसचे नशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर हे अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेले असल्याने त्यांचा फोन नॉट रीचेबल आहे. तर, आमदार खोसकर यांच्या पक्षांतराबाबत विविध बातम्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असताना दिसत आहे. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण करून, आमदार खोसकर हे भारतात परततील. त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आमदार खोसकर यांनी दिली आहे. (Congress)

Nashik Goda Aarti | त्र्यंबकेश्वरच्या महंतांचा लाठ्या-काठी घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा

कोण आहेत आमदार हिरामण खोसकर..?

नशिक जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या ही १५ आहे. यात हिरामण खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. नाशिकमधील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, हिरामण खोसकर हे काँग्रेसचे नेते असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे स्नेहबंध आहेत. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. (Congress)

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिकमध्ये; असा असेल ‘नशिक दौरा’..?

आमदार हिरामण खोसकर नाराज..?

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नाशिक दौऱ्याच्या दरम्यान नाशिकचे एकमेव काँग्रेस आमदार असलेले हिरामण खोसकर हेच उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे तेदेखील या नाराज आंदरांच्या यादीत येतात. नाना पटोलेंच्या नशिक दौऱ्यापासूनच हिरामण कहोसकर यांच्या या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, आता ते नॉट रीचेबल असल्याने त्यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. तर, आता अशोक चव्हाणांनंतर आता हिरामण खोसकरही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का ?. हे पहावे लागणार आहे.(Congress)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here