Police news : गुन्हेगारांवर वचक असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करू नका…

0
30

Police news : सध्या नाशिक जिल्हयातील ग्रामिण पोलीस दलात कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी बदलीचे वारे जोरात वाहत असुन त्या वार्‍याच्या झोकात अनेक दुय्यम पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या , त्यामुळे सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व त्यांचे सहकारी वर्षा जाधव यांची ही बदली करण्यात आल्याने आता सटाणा शहराला अनूभवी अधिकारी नसणार आहे त्यातच सटाणा पोलीस स्टेशनची धुरा आयपीएस अधिकारी यांच्या कडे तात्पुरत्या स्वरूपात असल्याने आगामी निवडणुका च्या पार्श्वभूमी वर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहाय्य्क पोलीस निरीक्षक किरण पाटील यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी होवू लागली आहे.

कालच निवडणुक आयोगाने सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर अनुभवी व तालुक्याची खडानखडा माहिती असलेल्या दोन्ही अधिकारी यांच्या पैकी एका अधिकारी ची बदली ला स्थगिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी सटाणा पोलीस स्टेशन ला पुर्ण वेळ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना तालुक्याची पुर्ण माहिती घेताच केवळ दिड महिन्यातच त्यांच्या ऐवजी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी यांच्या कडे सटाणा पोलीस स्टेशन ची धुरा देण्यात आली व पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांना पोलीस मुख्यालयात तीन महिन्यासाठी पाठवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुभवी अधिकारी हवा कारण नविन प्रभारी अधिकारी, त्यांच्या जोडीला नविन दुय्यम अधिकारी व कर्मचारी असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करणे अवघड जाईल.

 

किरण पाटील व वर्षा जाधव यांना तालुक्याची पुर्ण माहिती आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर त्यांचा दबदबा होता. या मुळे किमान काही महिने तरी किरण पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here