जळगाव : जिल्ह्यात धाड सत्राने खळबळ उडवून दिली आहे, वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या पथकाने काल सायंकाळी दोन हॉटेलवर छापा टाकत कारवाई केली व समाबंधिताना ताब्यात घेतले.
एम आय डी सी परिसरात जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या हॉटेल हेरंब पॅलेसचे मालक पंकज वासुदेव बोरोले तसेच व्यवस्थापक लोकेश राजेंद्र शिंदे या दोघांविरुद्ध स्रिया व मुली अनैतिक व्यापार अधिनियम 1956 कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली असून. या कारवाईत 3200 रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस पीआय विजय शिंदे करत आहेत.
काल शहरातील एमआयडीसी परिसरात दोन लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. या लॉजमध्ये १३ जोडपे सापडले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान लॉज मालक व मध्यस्थीना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून गोरख धंद्यांना आता तरी आळा बसणार का याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आम्ही मर्जीने इथे आलो आहोत त्यामुळे ही कारवाई चुकीचे असल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव येथील एमआयडीसी परिसरात दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली होती. यावेळी लॉजवर १३ युगुलं विचित्र अवस्थेत पोलिसांना आढलून आली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक धंदे सुरु असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली, त्यानुसार पथकाने गुरुवारी संबंधित लॉजवर छापा टाकत समाबंधीताना ताब्यात घेतले.
महाविद्यालयीन तरुणी
धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आलेत. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
मुली म्हणता आम्ही स्वतः आलो
दलालाच्या माध्यमातून मुली आंबशौकीन लोकांना पुरविल्या जात होत्या असे उघड झाले. मात्र आम्ही स्वतःच्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम