CM Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अंतिम टप्प्यात आली असून नेतेमंडींकडून शेवटचे प्रयत्न करण्यात आले. महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दादाजी भुसे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा ही पोलीस परेड ग्राऊंड, मालेगाव येथे पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी महायुतीचे मालेगाव आणि नाशिकमधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भुसे यांनी विकासकामांची माहिती देतानाच विरोधकांचा समाचार घेतला. तसेच मालेगावसाठी अनेक विकासकामांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
CM Eknath Shinde | ‘होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’; शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
मालेगावमध्ये पुन्हा धनुष्यबाणाचाच विजय होईल
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले, दादा भुसे यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला हा जनसमुदाय पाहता मला विश्वास आहे की, मालेगावमध्ये पुन्हा धनुष्यबाणाचाच विजय होईल. २० तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबायचे आणि २३ तारखेला आपल्याला विजयी गुलाल उधळायचा, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
इथे हिऱ्याच्या पोटी गारगोटी
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “तुमचा भुसा या एकनाथ शिंदेने 2 वर्षापूर्वी पाडलाय. या दाढीच्या नादी तुम्ही लागू नका. इथे हिऱ्याच्या पोटी गारगोटी अशी परिस्थिती आहे. दादा हा दिघे साहेबांचा चेला आणि बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. आम्ही तो सोडून आणला आणि या कामात तुमचे दादा माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. मालेगाव हे शिवसेनेचे आणि भगव्याचे पाईक आहे आणि हा दादा ह्या भगव्याचा सेवक आहे, असे म्हणत त्यांनी भुसे यांच्या कामाचे कौतुक केले.
CM Eknath Shinde | मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदें विरूद्ध कट; शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
होऊन जाऊद्या ‘दूध का दूध पाणी का पाणी’ म्हणत विरोधकांना खुले आव्हान
अडीच वर्षात तुम्ही काय केलं आणि दोन वर्षात आम्ही काय केलं. होऊन जाऊद्या ‘दूध का दूध पाणी का पाणी’, असे म्हणत त्यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. हे तुमचे सावत्र आणि कपटी भाऊ ही लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. त्यांना कोर्टाने हकलवून लावलं. या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना या १५०० रुपयांची किंमत नाही कळणार. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्यांना माहिती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जी कामं आम्ही केलीत. त्याची पोचपावती जनता आम्हाला २० तारखेला देणार आहे. कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांनी आरोपांना कामांनी उत्तर दिले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम