CM Eknath Shinde | मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदें विरूद्ध कट; शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

0
27
#image_title

CM Eknath Shinde | “राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट रचण्यात आला होता.” असा खळबळ जनक दावा सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांच्याकडून हा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

CM Eknath Shinde | मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; मुख्यमंत्र्यांकडून मोठे आश्वासन

शिंदे विरुद्ध देखील दिघे पॅटर्न? 

“मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे अशी शिफारस खुद्द पोलिसांकडून केली जात होती. तरी त्या फाईल वरती सही करण्यात आली नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभ करणे असा होतो. परंतु एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते ते या परिस्थितीतही खंबीर राहिले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील दिघे पॅटर्न वापरला जाणार.” अशा चर्चा सुरू असल्याचा खळबळजण खुलासा त्यांनी यावेळी केला.

आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल मोठे वक्तव्य

या पत्रकार परिषदेत बोलत असताना आनंद दिघे यांची हत्या झाली होती. असा आणखीन एक गंभीर आरोप संजय शिरसाटांनी केला. “ठाण्यातील सर्वांनाच याची माहिती आहे, आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला?” असा सवाल त्यांनी इथे उपस्थित केला. आनंद दिघेंची वाढती ताकद काहींच्या डोळ्यात खूपच होती. शिवसेनेने आनंद दिघे यांना मोठ्या पदावर आणून बसवले तर कोंडी होईल. हे ज्याच्या लक्षात आले होते त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा. कोणी आपल्यापेक्षा मोठे होऊ नये. असा विचार करणारी लोकं त्या पक्षात आहेत.” असे देखील शिरसाठ यावेळी म्हणाले.

CM Eknath Shinde | नाशकात शिंदेंची तोफ धडाडणार; आमदारासाठी मैदान गाजवणार

रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आनंद दिघे या नव्या पिढीला कळणे अत्यंत गरजेचे होते. पण त्यांच्या मृत्यूचे निवडणुकीच्या तोंडावर राजकारण नको. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली. आनंद दिघे हे बाळासाहेबांना त्यांचे दैवत मानत त्यांचे पाय धुवायचे. पण दिघेंच्या मृत्यूच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरेंनी त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला होता. असा आरोप रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल याची भीती वाटत होती. धर्मवीर आनंद दिघे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न वाखाडण्याजोगे आहेत. असे देखील रामदास कदम यांनी म्हटले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here