CM Eknath Shinde | ‘होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’; शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

0
58
#image_title

CM Eknath Shinde | आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेत निशाणा साधला असून, “हिंदू म्हणून जगण्याची काही लोकांना लाज वाटू लागली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांपासून आपण शिवसेनेला मुक्त केले आहे.” असं म्हणत टीका केली.

CM Eknath Shinde | मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदें विरूद्ध कट; शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही आणि विचारही सोडत नाही

“सत्तांतरानंतर अनेकांनी टीका केली हे सरकार 6 महिन्यातच कोसळेल. अशा टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पूरुन उरला आहे. आज ठासून 2 वर्ष पूर्ण केली आहेत. हा साधासुधा शिवसैनिक नाही. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाला सहन करू नका. हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं आणि शिवसैनिकांंच खच्चीकरण झालं असतं आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता.” असे म्हणत त्यांनी मविआवर टिका केली.आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र नंबर वन वर आलं नसतं. मविआच्या काळात तिसऱ्या नंबर असलेलं राज्य अवघ्या 6 महिन्यात 1 नंबर वर आलं. परदेशी गुंतवणूक आणणारं, महिला सबलीकरण करणारं, शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं, दहा लाख तरुणांना सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षण बेरोजगार भत्ता देणारं, देशात अटल सेतू सारखा सीब्रिज तयार करणारं आणि सर्वात मोठं मेट्रो जाळं तयार करणारही पहिलं सरकार ठरलं आहे.

सत्तांतर झालं नसतं तर शासन आपल्या दारी आलं नसतं

“सत्तांतर झालं नसतं तर लाखो कोटींचे प्रकल्प रखडले असते. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना ही आली नसती. माझ्या बहिणींना सन्मान मिळाला नसता, ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती आणि वृद्धांना व यश योजना आणि तीर्थ दर्शन योजना ही मिळाली नसती.”असे ते म्हणाले.

CM Eknath Shinde | मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; मुख्यमंत्र्यांकडून मोठे आश्वासन

मविआने अनेक कामे बंद पाडली

तसेच, मविआ सरकारने अनेक कामे बंद पाडली. लाडक्या बहिणीं विरोधात कोर्टात गेले. “ज्या लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घातला आहे, त्या लाडक्या बहिणी जोडा दिल्याशिवाय राहणार नाहीत.” शिवसेना कोणाची हे लोकांनी लोकसभेत ठरवलं शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न तुम्ही केला. बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदी-शहांना शिव्या देऊन मिळवलेली मतं तुम्हाला लखलाभ. “हा एकनाथ शिंदे महाराष्ट्र जिथे जातो, तिथे सर्वजण हसत स्वागत करतात आशीर्वाद देतात. हे आपण कमावलं आहे.” दोन वर्षांच्या कमी कालावधीत आपलं सरकार लाडकं सरकार झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here