Crime News | पोलीस स्टेशनसमोर बंद गाडीत सापडला मृतदेह

0
19

Crime News | पोलीस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या एका गाडीतून दुर्गंध येत असल्याने पोलिसांनी तपास केला असता, गाडीच्या मागील सीटवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. सतीश प्रभू कांबळे (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी, अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर एक व्हॅगनर गाडी उभी होती. या गाडीच्या मागील सीटवर एक व्यक्ती झोपलेले असल्याचे आढळून आले. दरम्यान, गाडीतून दुर्गंध येत असल्याने पोलिसांनी पाहणी केली असता, एक व्यक्ती झोपल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले.

Nashik News | नाशिकमध्ये पार पडणार भव्य महाशिवपुराण कथा; पालकमंत्री असणार कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष

दरम्यान, मृतदेह आढळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतच उभ्या असलेल्या अमित सतीश कांबळे या एका तरुणाने संबंधित मृत व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगितले. त्यांना दारूचे व्यसन असून त्यांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यामुळे ते सतत घरातून निघून जात असतात असे त्याने सांगितले. या घटनेची हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

फुटपाथवर झोपण्यावरुन वाद

फुटपाथवर झोपण्याच्या वादातून ७५ वर्षीय फिरस्त्याचा धारदार हत्यारांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. रविवारी १०.३० वाजेच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही घटना घडली आहे. मंगेश भागाजी भद्रिके  (वय ७५) असे  मयत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (रा. खडकी बाजार चौपाटी, खडकी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक अण्णा बादशाह गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड व भद्रिके हे दोघे फुटपाथवर राहत होते. या दोघांमध्ये फुटपाथवर झोपण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी गायकवाड याने दारू पिऊन येत, धारदार हत्याराने भद्रिके यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार करून त्यांचा खून केला आहे.

Crime News | चहा-बिस्कीट न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया सोडून निघून गेले

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here