Breaking : सिटी लिंकचे आंदोलन मागे; पालकमंत्री दादाजी भूसेंची शिष्टाई यशस्वी

0
12

Citi link strike : नाशिक शहराची वाहतूक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने नाशिककरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले, हे लक्षात घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी मध्यस्थी करत अखेर तोडगा काढला आहे. पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी महापालिका आयुक्त, संबंधित ठेकेदार, तसेच आंदोलकांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून चर्चा करत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार आंदोलकांनी देखील पालकमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेतून मार्ग काढत आंदोलन मागे घेतले.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सर्वसामान्य चाकरमान्यांची वाहतूक वाहिनी म्हणून सिटी लिंक बसेसला ओळखले जात आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी सिटी लिंक मार्फत अत्यंत कमी दरात वाहतूक व्यवस्था नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अत्यंत कमी पैशांमध्ये सुखकर करणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत असल्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याने नाशिककरांचे हाल झाले. याची दखल घेत पालकमंत्री भुसे यांनी कुठल्याही परिस्थितीत बससेवा सुरू करा तसेच थकीत वेतन बाबत तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत आंदोलकांना देखील दिलासा देण्याच्या सूचना केल्याने अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनामुळे नाशिक करांची गैरसोय झाली ती हे आंदोलन मागे घेतल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापासून शहरातील बससेवा कोलमडली होती यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करत संप मागे घेण्याची शिष्टाई यशस्वी केल्याने

बैठकीतून निघालेला तोडगा
1. एक महिन्याचा पगार दोन दिवसात केला जाईल.
2. जो काही दंड ठोठावण्यात आला आहे, त्या संदर्भात 31 जुलै पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here