धक्कादायक ! डॉक्टरने केले प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर अत्याचार

0
45

नाशिक – सिडको भागात एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तिथल्या डॉक्टरने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना शनिवारी घडली असून रविवारी ती उघडकीस आली आहे. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी संशयित डॉक्टरला अटक केली आहे. सदर तरुणी या हॉस्पिटलात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. ती ह्याच रुग्णालयातील एका खोलीत एकटीच राहत असल्याचे बघून त्या डॉक्टरने आपले हात-पाय दुखत असल्याचे कारण देत तिच्या खोलीत प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केले. तसेच, डॉक्टरने तिला ही घटना कोणाला सांगितल्यास कामावरून काढून टाकल्याचे धमकावले, असे त्या तरुणीने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अखेर पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित डॉ. कुटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी सांगितले आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here