नांदगाव तालुक्यातील मनमाड रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईतील लहान मुलांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलेल्या 30 अल्पवयीन मुलांना शुक्रवार दिनांक 16जुन 2023 रोजी बिहार येथील बालकल्याण समिती समोर हजर करण्यासाठी सुरक्षा रक्षकांसह लोकमान्य टिळक – गुवाहटी एक्सप्रेसने बिहार कडे रवाना झाले आहेत.
दिनांक 30 मे 2023 रोजी रेल्वे गाडी क्रमांक 01040 दानापूर – पुणे या एक्सप्रेस मधून सांगली येथील मदरशांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली तस्करी करत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने रेल्वे प्रशासनाला दिली. यावरून रेल्वे प्रशासन कारवाई करत बिहार राज्यातून महाराष्ट्रातील सांगली येथील मदरशामध्ये शिक्षणाच्या नावाखाली तस्करी करत असल्याच्या संशयावरून दानापूर – पुणे एक्सप्रेस मधून ही मुले घेऊन जाताना चार संशयित व्यक्तींसह 8 ते 15 वर्षे वयोगटातील तीस मुलांना रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे लोह मार्ग पोलीसांनी ताब्यात घेतली होते. यावेळी ताब्यात घेतलेल्या कुणाकडेच ओळखीचे पुरावे अथवा वैध कागदपत्रे आढळून आले नाही. असे संबंधित विभागाने सांगितले होते.
याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या तस्करी प्रकरणी मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर या मुलांना बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार नाशिक येथील बालसुधार गृहात दाखल केले होते. त्यानंतर दोन पथके तयार करत एक बिहारला तर दुसरे सांगली येथे मदरशात चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. यातील चार संशयतांना दहा दिवसांची पोलीस कोठडी तर त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे. दरम्यान मुलांचे पालक मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात येऊन त्यांनी आपला जबाब नोंदवला होता. पथकाने चौकशी केली आणि त्यानंतर नाशिकच्या बाल कल्याण समिती आणि पोलिसांनी बिहार येथे जाऊन तेथील बालकल्याण समितीच्या माध्यमातून प्रत्येक मुलाच्या पालकांची खात्री करून संबंधित कागदपत्र भरून घेतले त्यानंतर दिनांक 16 जून 2023 रोजी शुक्रवारी नाशिक येथील बालसुधारगृहात असलेल्या तीस मुलांची घर वापसी करण्यासाठी वीस जणांसह इतर अधिकाऱ्यांची विशेष पथक गोहाटी एक्सप्रेस ने बिहार कडे रवाना झाले आहेत.
या एक्सप्रेस मध्ये इंजिन पासून तिसरा डब्बा खास या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तेथे गेल्यानंतर बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांना सदर मुलांना सुपूर्त केले जाणार आहे. त्यानंतर स्थानिक सरपंच गावातील मुखिया आदींकडून पालकांची खातर जमा झाल्यानंतर सदर 30 मुले आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले. यावेळी मनमाड शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुहाटी एक्सप्रेस ने जाणाऱ्या सदर मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाणी, जेवण, फळे इत्यादी खाण्याचे साहित्य दिले. याप्रसंगी कय्यम सय्यद, हबीब शेख, सादिक पठाण, सद्दाम अन्सार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम