Child Marriage | पोलिस झाले वऱ्हाडी; समजूत काढत बालविवाह रोखला

0
32
Child Marriage
Child Marriage

Child Marriage |   शहर पोलिसांच्या दामिनी पथकातर्फे करण्यात आलेल्या एका कारवाईत बालविवाह (Child Marriage) रोखण्यात ह्या पोलिस पथकांना मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे ह्या बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यावर हे पथक स्वतः वऱ्हाडी म्हणून लग्नाच्या मंडपात तब्बल एक तासभर बसून होते. वधू-वर हे लग्न मंडपात दाखल होताच तेथे उपस्थित पोलिसांनी खात्री केली आणि बालविवाह होण्यापासून त्यांना रोखले. तसेच, दोन्ही कुटुंबांचे पोलिसांनी समुपदेशन केले व त्यांना समज दिली.(Child Marriage)

साध्या वेशात मंडपात उपस्थित असलेल्या दामिनी पोलिस पथकाने बुधवारी शहरात होणारा एक बालविवाह (Child Marriage) रोखला. तेव्हा वधूच्या आईने “मॅडम, मी धुणी-भांडी करते. मला दोन मुली आहेत. आजचा जमाना हा किती वाईट आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी व चांगली सोयरिक जुळून आल्यामुळे मी माझ्या मुलीचे लग्न लावत होते”, असे हात जोडून सांगितले. पण, कायद्यानुसार हा गुन्हा आहे, असे समजावून सांगताना पोलिसांनी उपस्थित सर्वांचेच समुपदेशन केले तसेच हा बालविवाह (Child Marriage) रोखण्यात दामिनी पथकाला मोठे यश आले.

Cafe Raid | कॅफे बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे; पोलिसांची धडक कारवाई

पथक तासभर मंडपात

कन्नड तालुक्यातील नवरदेव तसेच पडेगावातील साईनगर, तथागत चौक ह्या परिसरातील नवरीचा बालविवाह (Child Marriage) हा होत असल्याची खबर ही दामिनी पथकाला मिळाली आणि त्यानुसार, उपनिरीक्षक कांचन मिरधे, सहाय्यक फौजदार लता जाधव, पोलिस अंमलदार संगीता परळकर, अमृता भोपळे, सुरेखा कुकलारे व चालक मनीषा तायडे हे यावेळी साध्या वेशात लग्नस्थळी दाखल झाले होते. याठिकाणी मंडप टाकलेला होता. लग्नासाठी वऱ्हाडीदेखील दाखल झाले होते. बाजुलाच लग्नाचा स्वयंपाक सुरु होता. पण, नवरी आणि नवरदेवाला मंडपात यायला काही अवधी होता. त्यामुळे हे पोलिस पथक तब्बल तासभर मंडपातच बसून होते. जेव्हा वधू-वर मंडपात आले त्यानंतर ह्या पोलिसांनी आपली ओळख देत त्यांना हा बालविवाह (Child Marriage) करण्यापासून रोखले.

पालकांना नेले पोलीस ठाण्यात

वधू-वर हे मंडपात आल्यावर पोलिसांनी दोघांच्या वयाची खात्री केली. त्यानंतर मुलीचे १८ आणि मुलाचे वे हे २१ वर्षाहून अधिकचे वय हे लग्नाच्या योग्य वय असते. पण, पडेगावात होणाऱ्या ह्या लग्नात फक्त १५ वर्षांची मुलगी आणि  २० वर्षाच्या मुलाचे लग्न हे याठिकाणी लावले जात होते.(Child Marriage)

Kalyan News | भररस्त्यातून तरुण विद्यार्थ्याचे अपहरण आणि जबर मारहाण

त्यामुळे येथे वधू व वर हे दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगितले. तसेच, दोन्हीकडील पालकांना दामिनी पथकाने छावणी पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासमोर त्यांना हजर करून त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांचे म्हणणे समजून घेत निर्णय बदलला.(Child Marriage)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here