नाशिक प्रतिनिधी – शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आईस्क्रीम घ्यायला गेलेल्या एका चिमुकलीचा आईस्क्रीमच्या फ्रीझचा शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर घटना अशी, सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चिमुकली आणि तिचे वडील आईस्क्रीम घेण्यासाठी परिसरातील एका मेडीकल शॉपवर गेले. तेव्हा ही चिमुकली आईस्क्रीमच्या फ्रिजसमोर उभी राहिली, तर तिचे वडील फोनवर बोलत होते. अचानक चिमुकलीला फ्रीजचा शॉक बसला, मात्र ती तशीच उभी असल्याने ही बाब तिच्या वडिलांच्या ध्यानात आली नाही. फोनवरचे बोलणे संपल्यानंतर शेवटी तिच्या वडिलांच्या लक्ष गेले तोपर्यंत ती खाली कोसळली होती.
दरम्यान, ती बेशुद्ध झाली असता तातडीने तिला खाजगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान, ह्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, याकाळात शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशावेळी पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच निष्काळजीपणाही एखाद्याच्या जीवावर बेतू शकते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम