मुंबई:शिवसेनेतील आमदारांनी केलेला बंडामुळे आघाडी सरकार संकटात आली आहे. या अवघड राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे मुख उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी भेटले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी परिवारासह वर्षा निवासस्थान सोडले आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तीस ते चाळीस आमदार सोबत घेऊन गुवाहटीला गेलेले आहे. तर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद साधत शिवसैनिक हार मानणारा नसून लढणार आहे. मी मुख्यमंत्री नको हवा असेल तर मी हे पण सोडत आहे. तुम्ही पडू नका पुढे या असे भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली आहे.
परिवारासह सोडले निवासस्थान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान परिवारासह सोडले असून जागोजागी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. तर शिवसेनेचे मंत्री आमदार तुम्हाला जरी सोडून गेले असतील तरी सामान्य शिवसैनिक तुमच्यासोबत आहे हे दाखवून दिले आहे. अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा जोरदार घोषणाबाजी जागोजागी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम