एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव? काँग्रेसचीही सहमती

0
2

द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. त्यात आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांनी 25 हुन अधिक आमदारांना सोबत घेऊन सुरत गाठली. आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यानंतर शिंदे यांना मनवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर नुकतीच शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसोबत चर्चा झाली. आणि या चर्चेदरम्यान, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

दारम्यान, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर त्यास काँग्रेसची काही हरकत नसेल. असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत अजूनही ठोस निर्णय व्हायचा बाकी आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना, शिवसेनेनं आता भाजपसोबत सरकार स्थापन करावे, तरच आम्ही परत येऊ अशी अट घातली होती. मात्र शिंदे यांचा हा प्रस्ताव ठाकरे यांनी स्पष्टपणे नाकारला. आता महाविकास आघाडीला वाचवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव पूढे आल्याचे बोलले जात आहे. आता यावर काय निर्णय होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here