Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या या निर्णयाने ठाकरे गट येणार अडचणीत?

0
20

Mumbai : शिवसेनेचा वर्धापन जस जसा जवळ आला तसे पुन्हा एकदा शिवसेना आमचीच आहे असं म्हणत शिंदे आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू झाली. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी काही घोषणा करणार असल्याचे संगीतल्याने सगळ्याच लक्ष याकडे लागलं होतं. दरम्यान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची विशेषतपास पथकाद्वारे म्हणजेच एसआयटी द्वारे चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी संगीतल आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागांमध्ये अनियमितता असल्याचे आरोप करण्यात येत होते. दरम्यान याच झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकशीला मंजुरी दिली आहे. या समितीमध्ये आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मुंबई महापालिनगर पालिके मध्ये नोव्हेंबर २०१९ पासून ते ऑक्टोबर २०२२ कालावधी मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याच महालेखापाल (कॅग) च्या विशेष लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

दरम्यान या संदर्भामध्ये मुंबईतील अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन झालेल्या या अपहाराची तपासणी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करावी तसेच दोषी आढळून येणाऱ्या संबंधितां विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी असे निवेदन दिले होते. त्याच निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेतील तत्कालिन मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा हा निर्णय ठाकरे गटाला अडचणीत आणणार की केला गेलेला हा दावा फोल ठरणार हे बघणे महत्वाचं ठरेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here