Chhagan Bhujbal | भुजबळांकडून चर्चांना विराम; गोडसेंच्या प्रचारासाठी भुजबळ मैदानात

0
56
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ असा वाद सुरू होता. तर, आधी दोन वेळा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि समीर भुजबळ यांचा पराभव करणाऱ्या आणि आता थेट तिकीट हिसकावणाऱ्या गोडसेंचा प्रचार भुजबळ करणार का..? या चर्चा सुरू होत्या. तर, दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांनीही भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर ‘तुतारी’चा प्रचार करत असल्याचे आरोप केले होते. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | भुजबळांकडून चर्चांना विराम

दरम्यान, आज अखेर या सगळ्या चर्चांना विराम देत आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे हेमंत गोडसेंसाठी मैदानात उतरले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज सातपूर परिसरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार खासदार हेमेंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Chhagan Bhujbal | महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपली; कांदेंकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

या रॅलीला सातपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुरुवात करण्यात आली. तर, या रॅलीचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रॅली सातपूर पोलीस स्टेशन येथून सातपूर वसाहत परिसरात काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.(Chhagan Bhujbal)

यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक इंदुमती नागरे, रिपाईचे प्रकाश लोंढे, शशिकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ, नाना पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Chhagan Bhujbal | प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; गोडसेंना तारण्यासाठी मुख्यमंत्री नाशकात..? 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here