Chhagan Bhujbal | नाशिक : राज्यातील महिलांचे सशक्तीकरण करण्याचं काम महायुती सरकार करत असून राज्यातील महिलांसाठी सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कितीही पैसे लागले तरी योजना बंद होणार नाही. ही योजना अविरत सुरू राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महिला, युवक, शेतकरी, आदिवासी, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या सर्व घटकांना मदतीचा हात देण्यासाठी भरभरून मदत केली आहे. राज्यातील प्रत्येक महिला ही सबळ, सक्षम असावी यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) ही अतिशय महत्वपूर्ण योजना सुरू झाली असून राज्यातील अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे देखील जमा झाले आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याची टीका त्यांनी करत महायुती सरकारची लोककल्याणाची बांधिलकी जनतेपर्यंत या मेळाव्याच्या निमित्ताने पोहोचविण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal | ‘भुजबळसाहेब काय चुकीचे बोलले.?’; उदयकुमार आहेरांचा राणेंवर पलटवार
सरकारकडून मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या देशातील मुली पुरुषांच्या बरोबरीने शिकल्या तो देश नक्कीच प्रगतीकडे जात असतो. त्यामुळे राज्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी महायुती सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासह लेक लाडकी योजना, अर्थ सहाय्य योजना यासह अनेक योजना महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal | भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरू होणार
महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या भिडे वाड्यात पुन्हा एकदा मुलींची शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहिती सरकारने घेतला आहे. देशातील मुली या शिक्षणात कुठेही कमी राहणार नाही याची दक्षता शासनाकडून घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal | मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही; भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या
दुर्दैवी घटनेचं विरोधकांकडून राजकारण केलं जातंय
राज्यात काही दिवसापूर्वी नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली या घटनेबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांची भावना आहे. छत्रपती, फुले शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा घटनांना कदापिही थारा दिला जाणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मात्र विरोधकांकडून राजकारण केलं जातं असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा मोदी मैदान तपोवन येथे पार पडला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, आमदार किशोर दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व महायुती घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम