Chhagan Bhujbal | प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; गोडसेंना तारण्यासाठी मुख्यमंत्री नाशकात..? 

0
18
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवारांपेक्षा पक्षांतर्गतच नाराजी नाट्यच सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या महिनाभरापसून नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. दरम्यान, अगदी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, याआधी भुजबळ विरुद्ध गोडसे अशी इच्छुक उमेदवारांमधील तिकीटासाठीची लढत पाहायला मिळाली. या स्पर्धेत गोडसेंनी भुजबळांची उमेदवारी अक्षरशः हिसकावली होती आणि आता तेच हेमंत गोडसे (Hemant Godse)हे आज भुजबळांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी विनवणी करण्यासाठी सरसावले आहेत. (Chhagan Bhujbal)

गोडसेंची कोंडी..?

नाशिक आणि दिंडोरीमध्ये शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. गोडसे यांच्याकडे प्रचारासाठी कमी वेळ असून, त्यांच्यासाठी मतदार संघात फारकाही अनुकूल असे वातावरण असल्याचे दिसत नाही. तर, भुजबळांना डावलून गोडसेंना उमेदवारी दिल्याने ओबीसी समाजही नाराज असून, आम्ही आमची ताकद मतपेटीत दाखवू असा इशारा ओबीसी समाजाने दिला होता. तर, दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटाचा अजूनही गोडसेंच्या प्रचारात फारकाही उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचेही दिसत नाही. त्यामुळे एकूणच गोडसेंची कोंडी झाली असून, यासाठी भुजबळांचा वरदहस्त आपल्यावर असावा, यामुळे की काय..? आज प्रचार सोडून गोडसे भुजबळांच्या (Chhagan Bhujbal)भेटीसाठी भुजबळ फार्मवर दाखल झाले.

Chhagan Bhujbal | गोडसेंवर ओबीसी समाज नाराज; मतपेटीत ताकद दाखवणार

गोडसेंना तारण्यासाठी मुख्यमंत्री नाशकात 

गोडसेंच्या प्रचारासाठी अद्यापही महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यात काही समन्वय नाही, असे दिसत असून, गोडसेंना तारण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकमध्ये येणार असून, शिंदेंच्या उपस्थितीत आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Lok Sabha Election 2024)

Chhagan Bhujbal | काय म्हणाले भुजबळ..?

महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही सर्व गोडसेंच्या प्रचारात सहभागी आहोत. आमच्या पक्षाचेही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यापूर्वीच त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून, ते बोलावतील तेव्हा किंवा आयोजित असलेल्या सभांनाही मी हजर राहील, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. गोडसेंच्या भेटीनंतर मध्यमांसोबत ते बोलत हते.

Chhagan Bhujbal | भुजबळांना उमेदवारी न देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा जाहीर निषेध

२ वेळा पराभव आणि आता तिकीट हिसकावले 

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना मोठ्या फरकाने गोडसेंनी भुजबळांचा दारुण पराभव केला होता. यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही समीर भुजबळ यांचा गोडसेंनी पराभव केला होता. आता फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)हे महायुतीत आले असल्यामुळे दोनदा निवडणुकीत पराभूत केलेल्या आणि आता तिसऱ्यांदा उमेदवारी हिसकावलेल्या गोडसेंचा प्रचार भुजबळांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here