Chhagan Bhujbal | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या कुठल्या न कुठल्या कारणांमुळे वाद आहेत. आधी मराठा आरक्षण आणि व्हायरल ऑडिओ क्लिप, नंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक टोलेबाजी आणि वादग्रस्त विधानं. दरम्यान, आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी भुजबळ यांचे मुंबईतील निवसस्थानाच्या जागेचा वाद हा चव्हाट्यावर आणला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ईडीने भुजबळांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावरून दमानिया यांनी भुजबळांच्या परदेश दौऱ्यावर देखील टीका केली आहे. ईडीने छगन भुजबळांच्या विरोधातील मनी लाँड्रिंगची केस अजिबात मागे घेतलेली नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केला. तर, भुजबळांनी काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगत, हे प्रकरण बंद झाले असल्याचे उडवाउडवीचे उत्तरं दिलेत.
Maratha reservation | मराठा-ओबीसी वादात अजित दादांची उडी; भुजबळांना समर्थन
नेमकं काय आहे प्रकरण..?
अंजली दमानिया यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच जमीनीच्या फसवणुकीचे आरोप केले असून, त्यांनी भुजबळांच्या विरोधात जनहित याचिकाही दाखल केली होती. तर, ईडीने ही याचिका दाखल केलेल्या होत्या. २०१८ मध्ये ईडीने छगन भुजबळ यांना परदेश दौरे करण्यास मनाई करण्यासाठीचीही याचिका दाखल केलेली होती.
दरम्यान, ही याचिका ईडीतर्फे मागे घेण्यात आली असल्याच्याही अनेक बातम्या समोर आल्यात. पण ह्या बातम्या चुकीच्या असून, ईडीने कुठल्याही प्रकारच्या याचिका मागे घेतलेल्या नसल्याचेही यावेळी अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. ईडीने ज्यावेळी याचिका दाखल केली होती. त्यावेळीच छगन भुजबळ हे परदेशाततून आले होते. ते परदेशात जाऊन आल्यामुळे आता ह्या दाव्याला काहीही अर्थ नसल्याचे मत कोर्टाने मांडले होते.
भुजबळांना क्लीनचिट नाही
मनी लाँड्रिंगची कुठल्याही प्रकारची केस ही ईडीने मागे घेतलेली नाही, असा दावाही दमानिया यांनी केला. “मंत्री भुजबळ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात कुठलीही क्लीनचिट दिलेली नसून, ही याचिका मागे घेतलेली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या वयक्तिक राजकीय वादात आपल्याला पडायचेही नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला हा लढा होता आणि तो मी मरेपर्यंत लढत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग | नाशकात वातावरण तापलं! भुजबळांचा ताफा जाताच गावकऱ्यांनी गोमुत्र शिंपडलं
भुजबळांचे स्पष्टीकरण
हा सर्व काहीतरी गैरसमज असून, ही बातमी चुकीची आहे. किमान दोन-तीन वर्षांपूर्वी परदेशात मला कामानिमित्त जायचं होतं. तेव्हा आम्ही कोर्टाकडून परवानगी मागितली होती. त्यावेळी कोर्टाने ती परवानगी दिल्यानंतरच मी दोनदा परदेशात जाऊन आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
परदेशात जाण्याच्या विरोधातील हे प्रकरण आपण विसरलोच होतो. ईडीही हे प्रकरण विसल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे. त्यानंतर कोर्टानेही ह्या याचिकेला आता अर्थ उरलेला नसल्याचे मत मांडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सदन प्रकरणातूनही आम्ही डिस्चार्ज झालेलो आहोत, दरम्यान, आपली आता या आरोपातून सुटका झाली पाहिजे, अशी मागणीही भुजबळांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम