Chhagan Bhujbal | ६ कोटी ७० लाखांच्या निधीतून लासलगाव बस स्थानकाचे रुप पालटणार

0
17
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  नाशिकच्या लासलगाव येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या वतीने ४ कोटी ८० लाख तर, ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियानांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेतून बसस्थानक आणि वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल १ कोटी ९० लाख असे एकूण ६ कोटी ७० लाखांच्या विविध कामांना प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली आहे.(Chhagan Bhujbal)

त्यामुळे लवकरच येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी होऊन प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. लासलगाव बसस्थानकाचे बांधकाम सन १९७५ मध्ये झाले होते. सदर बसस्थानकाला ४९ वर्षे झाल्यामुळे या बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा व शेतमालाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बसस्थानकातून दररोज ५३ बसेस सुटतात तर ५० हून अधिक खेड्यांमधील प्रवाशी या स्थानकाचा लाभ घेतात.

Loksabha 2024 | लोकसभेचा बिगुल वाजला; संभाव्य तारखा जाहीर..!

मात्र, या बसस्थानकामधील असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने या बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या माध्यमातून लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी ८० लाख तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेच्या माध्यमातून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(Chhagan Bhujbal)

लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर झालेल्या या ४ कोटी ८० लक्ष रुपयांच्या निधीतून बसस्थानकाचा तळमजला आणि पहिला मजला विकसित करण्यात येणार असून, येथील बसस्थानकात नागरिकांना पिण्यासाठी तसेच वापरासाठी पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या यंत्रणाही  विकसित करण्यात येणार आहे.

Deola | राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सहस्रलिंग रामेश्वर येथे संपन्न

तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी ९० लाखांच्या निधीतून बसस्थानक व वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यात येऊन सुसज्ज असे बसस्थानक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.(Chhagan Bhujbal)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here