Chhagan Bhujabal | येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी मुख्यतः विकासावर भाष्य केले. येवला मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचाराला सुरुवात केली असून यावेळी व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, अंबादास बनकर, डी. के. जगताप, माजी आमदार कल्याणराव पाटील, पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे आदी समाजाचे नेते उपस्थित होते.
Chhagan Bhujbal | ‘महायुतीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्या’; भुजबळांचं गणरायाला साकडं
भुजबळांनी घेतला विरोधकांचा समाचार
यावेळी बोलताना भुजबळांनी, “विरोधकांकडून जातीचे विष पेरण्याचे काम केले जात आहे” असा आरोप केला आहे. “ज्यांच्याकडे सांगण्यासारखे व करण्यासारखे काही नसते, तेच निवडणुकीत जातीचा आधार घेतात. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील ‘एका जातीवर अवलंबून राहत निवडणूक जिंकता येत नाही.’असे म्हटले आहे. त्यामुळे ते निवडणुकीपासून लांबच राहिले आहेत. तेव्हा यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
विकासासाठी मी येवल्याची निवड केली
“ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मला जुन्नर मतदारसंघाचा विकास करायला सांगितला होता. पण मी येवल्याची निवड केली. या भागाच्या विकासासाठी मला काम करायचे होते. ते काम मी करून दाखवले आहे. येवला मतदारसंघात पाणी आणले, 38 गावांची पाण्याची योजना राज्यात फक्त येवला येथे सुरू आहे. अनेकांना त्याचे आश्चर्य वाटते ते विचारतात हे कसे घडले? अन् त्यावर आमचे एकच उत्तर असते, ते म्हणजे हा भुजबळ पॅटर्न आहे. समुद्राला वाहून जाणारे व अन्य राज्यांना जाणारे सर्व पाणी आपल्याला अडवायचे आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी आणून हा परिसर पाणीदार करायचा आहे. तसा निर्धारच मी केला आहे. येत्या काळात पाच वर्षात प्रत्येकाला घर मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील. मागेल त्याला घर दिले जाईल. कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही. यासाठी माझा प्रयत्न असेल.” असे म्हणत आपली विकास कामांसाठी आखलेली रणनीती स्पष्ट केली.
Chhagan Bhujbal | लाडकी बहिण योजना अविरत सुरू राहील; मंत्री भुजबळांचा बहिणींना विश्वास
विकास कामांचा पाढा वाचला
पुढे बोलत त्यांनी, “मला विकास करायचा आहे. त्यावरच मी काम करत आहे. कोणी वंदो अथवा निंदो मात्र विकास करणे हाच आमचा धंदा हे सांगायला मी कधीही कचरणार नाही. संपूर्ण भारतात जी योजना नाही, ती मी येवल्यात आणली आहे. 17 एकर जागेत ग्रामसदन उभे राहिले आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी व विभाग नगरपालिका हे एकाच ठिकाणी आणल्यामुळे सर्वांचीच कामे एका ठिकाणी होत आहेत. यासारखे अनेक प्रकल्प सांगता येतील” असे म्हणत त्यांनी विकास कामांचा पाढा गिरवला. तसेच, “मी आमदार असताना येवल्यात पाच पैठणीची दुकाने होती. आता त्यांची संख्या 500 वर गेली आहे. पर्यटन मंत्री असताना सर्व तीर्थस्थळे व मंदिरांच्या विकासाचा प्रकल्प मी राबवला होता व त्यातून जिल्ह्यातील अनेक मंदिरांचा कायापालट होत त्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला.” असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम