Chhagan Bhujbal | ‘महायुतीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्या’; भुजबळांचं गणरायाला साकडं

0
112
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  संपूर्ण राज्यात सध्या गणरायाच्या आगमनामुळे (Ganeshotsav 2024) आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी गणपती बाप्पाला अजब साकडे घातले आहे. “आमच्या महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना सद्बुद्धी द्या, जेणेकरून ते अशी चुकीची वक्तव्य करणार नाही”, असं साकडंच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गणरायाला घातले आहे.

Chhagan Bhujbal | लाडकी बहिण योजना अविरत सुरू राहील; मंत्री भुजबळांचा बहिणींना विश्वास

योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत खडाजंगी 

महायुतीत सध्या विधानसभेच्या जागावाटपावरुन आणि लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून चांगलंच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. तानाजी सावंत यांचा अजित पवार गटाच्या नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हायरल विडियो आणि त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची “अर्थखातं हे सर्वात नालायक खातं असल्याची जाहीर टिका. यामुळे महायुतीतील अंतर्गत खदखद पुन्हा चव्हाट्यावर येत असून, याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गणरायाला साकडं घालत शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

Bachhu kadu | अन् संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली

Chhagan Bhujbal | जनतेसमोर असं चित्र तयार करू नका.. 

“परमेश्वराने आमच्या या महायुतीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सदबुद्धी द्यावी. जेणेकरून ते अशी चुकीची वक्तव्यं करणार नाहीत. आपण सगळे एक आहोत व आपण सगळे मिळूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असं महायुतीच्या नेत्यांनी वागू नये. आपल्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा मतभेद असल्याचं चित्र जनतेसमोर आणू नये, असं यावेळी भुजबळ म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here