Chh. Sambhaji Nagar | राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक हादरवणाऱ्या घटना ह्या समोर येत असतात. यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना ही छत्रपती संभाजी नगर मधून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ह्या घटनेत एका वयोवृध्द्ध महिलेसओबात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असता, ह्या महिलेने विरुद्ध केला व याचमुळे ह्या महिलेची हत्या करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. एका वयोवृद्धवर महिलेवर दारुच्या नशेत अतिप्रसंग करण्या व्यक्तीला विरोध केल्यामुळे या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
Nagpur Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने एक्स गर्लफ्रेण्डला संपवलं
या संतापजनक घटनेमुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरली असून, घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते. तसेच, पोलिसांनी ह्या संशयित आरोपीला ताब्यात घेत या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. अनुसयाबाई दामु जाधव (वय – ७५ वर्ष) अशी हत्या झालेल्या ह्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द गावात ह्या गावात ह्या मयत वृध्द महिलेचे दगडावर डोके आपटत तिची हत्या केल्याची घटना ही आज रात्री दोन वाजेच्या दरम्यान उघडकीस आलेली आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच शिउर पोलिसांनी येथील घटनास्थळी धाव घेतली. आणि तत्काळ या प्रकरणी चौकशीचे सूत्र फिरवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेले आहे.
Jalna Crime | एका घरामुळे पोटच्या मुलाने बापाला मारहाण करीत संपवले
दरम्यान, सुरवातीला हा सर्व प्रकार हा चोरीच्या उद्देश्याने झाला असल्याची चर्चा सुरू होती. पण, आरोपी हा चोरीसाठी नाही तर दारुच्या नशेच्या धुंदीत ह्या वृध्द महिलेवर अतिप्रसंग करण्यासाठी आलेला होता. मात्र, यावेळी संबंधित महिलेने विरोध केल्यामुळे ह्या वृध्द महिलेची मद्यधुंद आरोपीने हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, ह्या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्या प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
आरोपी ताब्यात…
दरम्यान, ह्या घटनेबाबत माहिती मिळताच शिउर पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप पाटिल हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे पोलीस हे घटनास्थळी पाहणी करत असतानाच मृत महिलेच्या घरासमोरील एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आला आणि अधिक चौकशी करता त्याचाही यात सहभाग झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम