चांदवड नगर परिषदेची विकास योजना मार्गदर्शक व संवाद बैठक संपन्न

0
2

विकी गवळी
चांदवड : शहराचा विकास आराखडा करण्यासाठी चांदवड नगरपरिषद आयोजित विकास योजना मार्गदर्शन व संवाद बैठक मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. सहाय्यक संचालक नगर रचना विभागच्या अधिकारी मंजुषा घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या वेळी ज्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना सुख सुविधा व योजना राबवल्या जातात या सर्व सुविधा चांदवडच्या नागरिकांना मिळायला हव्यात सुरू असलेले विकास कामे चांगल्या पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चांदवड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदमध्ये झाल्यापासून विकास आराखड्याचे काम सुरू होते या निमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये चांदवड शहरातील नागरिकांनी शहरातील सोयी सुविधा मिळाव्यात. चांदवड शहरालाच ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने येथे चार ते पाच किल्ले असून यांचे देखील संवर्धन झाले पाहिजे व जॉगिंग ट्रॅक, खेळण्यासाठी मैदानी, गार्डन, या विविध मागण्यांमुळे ही बैठक चांगलीच गाजली या बैठकीमध्ये सर्व चांदवड शहरातील राजकीय, सामजिक सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मुद्दे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी मांडले

चांदवड शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून पुढील काळाचा विचार करता चांदवड शहराच्या सीमांचा विस्तार करून येलो पट्टा वाढवून शहराचा विकास करावा व चांदवड शहरातील खोकड तलावात बोट क्लब सुरू करावा.

आराखडा करताना यामध्ये नागरिकांनाही सामावून घेणे व चांदवड शहरातील नागरिकांच्या मागण्यांप्रमाणे येथे देवी अहिल्याबाई यांनी काही काळ वास्तव्य केले असल्याने त्यांचा रंगमहाल हा किल्ला याचे संवर्धन होऊन नागरिकांसाठी लवकर खुला करण्यात यावा व अहिल्यादेवी यांचे स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक होणे गरजेचे आहे.

चांदवड शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर असून येथे पाच राज्यातील सीमा मिळून येतात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते व अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याने अपघात टाळण्यासाठी रिंग रोड तयार करण्याची गरज आहे.

चांदवड शहर धार्मिक शहर असल्याने रेणुका देवीचे पुरातन मंदिर आहे. यासाठी त्या परिसरात झाडांची व गार्डन सुविधा केली पाहिजे. चांदवड शहरात सुशिक्षित प्रवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मनोरंजनासाठी थेटरची आवश्यकता असून येथे या सुविधा गरजेचे आहेत व चांदवड शहरे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे दर सोमवारी आठवडे बाजार भरतो परंतु ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरवण्यात येतो ती जागा सुद्धा कमी पडत असल्याने नगरपरिषद ने जागा राखीव करून जागा उपलब्ध करून देणे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्क सुविधा करण्यात यावी या विविध योजनांच्या मागण्या करण्यात आल्या श्री नेमिनाथ जैन इंजिनीरिंग कॉलेज मधील प्रा प्रद्युमन बोरा यांनी विषय मांडला की ते राहत असलेल्या 26 फ्लॅटच्या ओपन स्पेस मध्ये स्मशानभूमी आहे तरी मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस खुला करून द्यावा तसेच धुराचा त्रास होतो यावर सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरनार व इतरांनी आक्षेप घेतला व ही पारंपरिक ठिकाण असून तेथे अत्याधुनिक सुविधा करणार असून ती कोठे हलवणार? बैठकीसाठी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक मंजुषा घाटे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील, उपविभागीय अधिकारी व प्रशासक चंद्रशेखर देशमुख, स्वच्छता विभागाचे अधिकारी सत्यवान गायकवाड, अभियंता शेषराव चौधरी, कर सहाय्यक अधिकारी राजपूत मॅडम व सर्व कर्मचारी अधिकारी सर्व नगरसेवक व राजकीय, सामजिक क्षेत्रातील नागरिक या बैठकीस उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here