Chandwad-Deola | मंत्रीपदाची अशी हाव की भावाच्याच पाठीत घातला घाव..?

0
111
Chandwad-Deola
Chandwad-Deola

Chandwad-Deola |  राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, महायुतीच्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजीनाट्य सुरू आहे. नाशिक पश्चिम, चांदवड-देवळा, नांदगाव, दिंडोरी या मतदार संघांमध्ये महायुतीच्या इच्छुकांमध्ये चढाओढ आणि बंडाची तयारी सुरू आहे. मात्र, सध्या जिल्हाभरात जोरदार चर्चा आहे ती चांदवड देवळा मतदार संघाची. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची शक्यता वर्तविली जात होती. ते सत्यात उतरत असून, चांदवड देवळा मतदार संघात ‘दादा विरुद्ध नाना’ हा संघर्ष अटळ असल्याचे दिसत आहे.(Chandwad-Deola)

काल चांदवडच्या सभेत केदा आहेर यांनी राहुल आहेरांच्या शांत, संयमी स्वभावाचा बुरखा फाडत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. भर सभेत पुरावे दाखवत त्यांनी “16 तारखेलाच दिल्लीत उमेदवारांच्या नावाची यादि फायनल झाली असून, हे 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की, मी माघार घेत आहे आणि केदा आहेरांच्या नावाची शिफारस करणार आहे. माझा राहुल दादा शांत, संयमी आहे. पण त्याचं खरं कपटी रूप तुम्हाला आता दिसलं असेल”, या शब्दांत जोरदार हल्लाबोल करत चांदवडच्या सभेत राहुल आहेरांचे (Rahul Aher) वाभाडे काढले.

Keda Aaher | केदा आहेरांचा मोठा गौप्यस्फोट; राहुल आहेरांना ‘कपटी’ म्हणत धू धू धुतलं

Chandwad-Deola | आमदारकीची हाव संपेना..!

वास्तविक पाहता स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्या संघटन काळात त्यांच्यासोबत केदा आहेर (Keda Aher) हेच होते. त्यामुळे त्यांच्यानंतर खरे राजकीय वारसदार हे केदा आहेरच मानले जात होते. मात्र, स्व. बाबांच्या शब्दाखातर केदा आहेरांनी मोठ्या मनाने माघार घेत भावासाठी त्याग केला आणि एकदा नव्हे तर सलग दोनदा त्यांना निवडून आणण्यासाठी परिश्रमही घेतले. त्यामुळे यंदा दादांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घ्यावी आणि नानांना मदत करावी, अशी भावना मतदार संघातील नागरिक आणि आहेर समर्थकांमध्ये आहे. मात्र, कदाचित हॅटट्रिक करून तरी मंत्रीपदी वर्णी लागेल अशी आशा आणि मंत्रीपदाची स्वप्नं पडत असल्याने यंदाही राहुल दादांची आमदारकीची हाव काही संपेना..! अशी चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.(Chandwad-Deola Constituency)

Deola | केदा आहेरांची उमेदवारी नाकारणे भाजपला पडले महागात; देवळ्यात भाजपला मोठे खिंडार

ही निवडणूक राहुल आहेरांना अवघड जाईल..?

दरम्यान, काल चांदवडच्या सभेत केदा आहेरांनी रोखठोक भूमिका घेतल्यानंतर आज ते आपल्या होम ग्राऊंडवर मेळावा घेणार असून, आजच्या सभेत ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे काल चांदवडमध्ये राहुल आहेरांचे वाभाडे काढल्यानंतर आज देवळा येथे होम ग्राऊंडवर केदा आहेर काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मागील दोन्ही निवडणुकीत देवळ्याची जनता आणि केदा आहेर हे एकजुटीने राहुल आहेर यांच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा स्व. बाबांचे स्वप्न पूर्ण झाले. हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी केदा आहेर यांची भूमिका महत्वाची होती. मात्र, आता केदा आहेर आणि त्यांचे समर्थकच राहुल आहेरांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक राहुल आहेरांना अवघड जाईल. यात शंकाच नाही.

Chandwad-Deola | घात झाला घात..!; दाखवून त्यागाचा लळा केसानेच कापला गळा..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here