Breaking| विकी गवळी – चांदवड : नाशिक जिल्हा हा सध्या अनेक कारणांनी गाजताना दिसत असून नाशिक मधील गुन्हेगारी दिवसेंदवस वाढत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर येत असून चांदवड मध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडे कोविड पॉजिटिव्ह..!
Breaking|नेमकं घडलं काय?
चांदवड तालूक्यातील चांदवड-मनमाड राज्य महामार्गवर MH 15.DK 5193 हा दहा टायर ट्रक पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आला होता पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. यात चौकशी केली असता ट्रक मध्ये स्फोटक भरलेल्या पिशव्या आढळून आले आहेत.
Incognito mode | गुपचुप Incognito मोडवर सर्च करताय ?; मग ही बातमी वाचाच
दरम्यान, यातच विस्फोटक डायनेक्स प्राईमचे 100 बॉक्स आणि डायनेक्स पावरचे 40 बॉक्स असे 94,400 रुपये किमतीचे विस्फोटक व एकूण दहा टायर असलेल्या ट्रकसह एकूण 7 लाख 94 हजार 400 रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून भा. द. वि. कलम 188, 286, व 34 अधिनियम 1984 5,6,9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील अधिक तपास चांदवड पोलीस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम