Chagan bhujbal : बालेकिल्ल्यात भुजबळांचं जोरदार स्वागत

0
19

Chagan bhujbal  – अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्याच्या मंत्री मंडळात शपथ घेतल्यानंतर ना.छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर आहे. आज विंचूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच विंचूर परिसरातील स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रीमंडळात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते मिळाले आहे. यानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी परिसरातील स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भूजबळ म्हणाले, “कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना ५४ हजार दुकानांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पुरवले. सगळे बंद होते, केवळ रेशन दुकाने आणि रुग्णालये चालू होती. पोलीस, डॉक्टर आणि रेशन पुरवणारे सगळे कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. अनेक अडचणी येऊनही कुठे अन्नधान्य पोहचले नाही, असे झाले नाही.”

 

गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरु झाल्या. ते खाते मिळाल्याने आनंदच आहे, सर्वांचे पोट भरणार खात आहे. यावेळी देखील चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. मंत्री एका घटकाचे नसतात. त्यामुळे कोणत्याही खात्यातून विकास साधला जातो. आता शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यास मदत होईल. पुन्हा एकदा विकास सुरु होण्यास मदत मिळेल.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here