Chagan Bhujabal | भुजबळांच्या सभेत हनुमान चालीसेमुळे व्यत्यय; तातडीने आवाज कमी करण्याचे दिले आदेश

0
39
#image_title

Chagan Bhujabal | सध्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना जवळच्या मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. त्यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. त्यामुळे मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले.

Chagan bhujbal : बालेकिल्ल्यात भुजबळांचं जोरदार स्वागत

नेमकं घडलं काय? 

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे एका कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी स्थानिक रस्त्यांसंदर्भात बोलत असताना जवळच्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. तितक्यात एका कार्यकर्त्याने जोशाता “बजरंगबली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी” असे म्हटले, त्यावर छगन भुजबळ यांनी “बजरंगबलीच्या हाती सगळं आहे…होय…असे म्हटले. त्यावर “नाही नाही हनुमान चालीसा आहे ती रोज लागते.” अस कार्यकर्ता म्हणाला.

त्यावर भुजबळांनी, “शक्य झाल्यास आवाज थोडा कमी केला तर बरं होईल. थोडा वेळ आवाज कमी करा..पोलिसांना माझा सांगणं आहे. एक दहा मिनिटे बजरंग बलीला सांगा…बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली…. असं म्हणतं जरा आवाज कमी करा…मी सुद्धा बजरंगबलीचाच भक्त आहे बाबा…त्याच्याच आशीर्वादाने हे सर्व काम सुरू आहे.” असे म्हणत मंदिरात सुरू असलेल्या हनुमान चालीसेचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली. इतकेच काय तर “जरा पोलीस इन्स्पेक्टरांनी ताबडतोब याची दखल घ्यावी.” असा आदेशही पोलिसांना दिला.

Chagan Bhujbal | इकडे मराठे आंदोलनच करत राहिले; तिकडे भुजबळांनी साधलं ओबीसींचं हित

मंदीर प्रशासनाचे मानले आभार

त्यानंतर, “बजरंग बलीच्या मंदिरातील लोकांनी माझी विनंती ऐकली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि तो परमेश्वर तुम्हा, आम्हाला सर्वांना शक्ती, बुद्धी आणि युक्ती देवो.” असे म्हणत भाषण संपल्यानंतर भुजबळांनी हनुमान चालीसेचा आवाज कमी केल्याबद्दल मंदीर प्रशासनाचे आभार मानले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here