Chagan Bhujabal | विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात झाली आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. या वक्तव्यात त्यांचा रोख नेमका कोणावर आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाली आहे.
“पुतणे काकांचा ऐकत नाहीत”- छगन भुजबळ
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मला मोकळेपणाने भाष्य केले आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असून याबद्दल प्रश्न विचारला अअसता, भुजबळांनी “सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. असं आता वाटायला लागलं आहे. पुतणे काकाचं ऐकत नाहीत असं वाटत आहे. राज्यात हा संघर्ष फार पाहायला मिळाला आहे. शरद पवार यांचे पुतणे, अजित पवार यांचे पुतणे, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे” अशी यादीच भुजबळांनी यावेळी वाचून दाखवली.
Chagan Bhujabal | युवक राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा
नांदगावातील निवडणूक अधिक चुरशीची होणार
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या घरातच बंडखोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. समीर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ हे आता सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगावमध्ये निवडणूक लढणार असून त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून समीर भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे नांदगावातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम