CCTV in girls washroom : मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही बसवल्याप्रकरणी प्राचार्याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील हा व्हिडिओ असल्याच देखील समोर आलं आहे.
पुण्यातील तळेगाव येथे मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही बसवल्या बद्दल नागरिक आणि संघटनांकडून शाळेच्या मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींवरील होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यातच तळेगाव मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अद्याप पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पुण्यातील तळेगाव येथे एका शाळा प्रशासनाने मुलींच्या वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्या बाबत पालकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. काही लोकांनी मुख्याध्यापकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ बनवला. मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पुण्यातील तळेगाव अंभी येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाला पालकांनी मारहाण केली. संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि यावरून बाचाबाची झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात काही संघटना आणि पालक प्रश्न विचारण्यासाठी शाळेत आले असता मुख्याध्यापकांना शाळेसमोरच काही लोकांनी मारहाण केली. पालकांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, संबंधित शाळा हिंदू सणांना सुटी देत नाही, शाळेत बायबलची प्रार्थना केली जाते, शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही बसवले आहेत. याप्रकरणी संबंधित शाळेने काहीही बोलण्यास नकार दिला आहे, तर पोलिसही गुन्हा दाखल न झाल्याने बोलण्यास तयार नाहीत.
मात्र घडलेला हा प्रकार धक्कादायक व तितकाच संतापजनक असल्याने या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम