ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची अखेर बदली ?

0
50

नाशिक : राज्य सरकारकडून गेल्यावर्षी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या अचानक बदलीचे आदेश काढण्यात आले होते. पण त्यावेळी पाटील यांचा नाशिकमधील कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे पाटील यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणाकडे (कॅट) या बदलीविरोधात दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली असून तत्कालीन आदेशानुसार आता सचिन पाटील यांची बदली होणार आहे.

९ सप्टेंबर २०२१ रोजी गृह मंत्रालयाकडून अचानकपणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची थेट मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदलीचे आदेश काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या जागेवर तत्कालीन सुरक्षा विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदलीला जिल्हाभरातून विरोध झालेला होता. तसेच पाटील यांना ग्रामीण पोलीस अधिक्षकपद स्वीकारून एक वर्षदेखील उलटला नव्हता. त्यामुळे पाटील यांनी कॅटकडे धाव घेतली होती. आणि तेव्हा त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती.

दोन दिवसांपूर्वीच या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार ‘कॅट’ने पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नव्याने योग्य त्याठिकाणी बदली करण्याचे आदेश दिले आहे. तसेच त्यांच्या जागेवर तत्कालीन आदेशानुसार उमाप यांच्या नियुक्तीलाही कॅटकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. शहाजी उमाप सध्या राज्याच्या मुंबई येथील नियंत्रण कक्षाच्या अधीक्षक पदावर आहे. म्हणजे या आदेशानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांची बदली आता निश्चित आहे.

असा आहे ‘कॅट’चा आदेश

अर्जदार सचिन पाटील यांची पुढील चार आठवड्यांमध्ये बदली करण्यात यावी. त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर पूर्वीच्या आदेशानुसार उमाप यांना नियुक्त करण्यात यावे. तसेच पाटील यांना योग्य त्या ठिकाणी त्यांच्या पदानुसार पदस्थापना करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here