Skip to content

गव्‍हाच्या निर्यातीवर रोख, भारत सरकारने उचलले मोठा पाऊल


गव्‍हाच्या निर्यातीवर रोख, भारत सरकारने उचलले मोठा पाऊल

गव्‍हाच्‍या दरात सातत्‍याने वाढ होत असल्‍याने सरकारने गहू निर्यातीवर तातडीने बंदी घातली आहे. देशात पेट्रोल-डिझेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही प्रचंड महागल्या आहे. गव्हाच्या पिठाचे दरात वाढ झाली. त्यामुळे वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने तातडीने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गहू दरात भरमसाठ वाढ झाली. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गव्‍हाच्‍या किंमतीत ४० टक्‍क्‍यांहून जास्त वाढ झाली आहे. त्‍यामुळे गहू निर्यातीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. अशा काळात देशातंर्गत गव्हाच्या मागणीत वाढ झाली आहे. गहू आणि गव्‍हाचे पीठ यांच्‍या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गहू दरात झालेल्‍या वाढीचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे. शेतकर्‍यांना सरकारने निश्‍चित केलेल्‍या किमान माफक दरापेक्षा अधिक पैसे मिळत आहेत.

भारतात गव्हाच्या किंमती ऐतहासिक पातळीवर गेल्या आहेत. देशातील खाद्य सुरक्षेचा विचार करता तसेच शेजारील आणि गरीब देशांच्‍या समर्थनासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतल्याचे स्‍पष्‍ट केले आहे. देशातील गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारने त्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यावर्षी गव्‍हाच्‍या किंमतीमध्‍ये १३ टक्‍के वाढ झाली आहे. युद्धामुळे दोन्ही देशातून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!