भारतातील सर्वात मोठा कार चोर अनिल चौहान अखेर दिल्ली पोलिसांनी पकडला आहे. अनिलवर देशाच्या विविध भागातून 5000 हून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय अनिलची दिल्ली, मुंबई आणि ईशान्य भागात बरीच मालमत्ता आहे. तो आलिशान जीवनशैली जगत होता.
पोलिसांचा दावा आहे की तो देशातील सर्वात मोठा कार चोर आहे आणि त्याने गेल्या 27 वर्षांत पाच हजारांहून अधिक कार चोरल्याचा आरोप आहे. मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष कर्मचाऱ्यांनी त्याला देशबंधू गुप्ता रोड परिसरातून गुप्त माहितीवरून पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सध्या शस्त्रास्त्र तस्करीत गुंतला आहे. तो उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणत होता आणि ईशान्येकडील राज्यांतील प्रतिबंधित संघटनांना पुरवत होता.
असे सांगितले जात आहे की अनिल चौहान ऑटोरिक्षा चालवायचा 1995 मध्ये दिल्लीच्या खानपूर भागात राहत होता आणि ऑटो चालवायचा. यानंतर हळूहळू त्याने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले 1995 नंतर गाड्या चोरायला सुरुवात केली.
अनिल चौहान 1995 पासून कार चोरत आहे. अनिल मारुती 800 कार चोरण्यासाठी कुख्यात होता. अनिल चौहान देशाच्या विविध भागांतून गाड्या चोरून नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांत पाठवायचा.
2015 मध्ये अनिल चौहानलाही आसाम पोलिसांनी अटक केली होती. तो पाच वर्षे तुरुंगात राहिला आणि 2020 मध्ये त्याची सुटका झाली. त्याच्यावर 180 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे अनेक राज्यांमध्ये बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली, मुंबईपासून पूर्वेकडील राज्यांपर्यंत त्यांनी अनेक मालमत्ता उभ्या केल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम