crime news | मतदानाला आला, म्हणून चाकूने केला हल्ला

0
41

crime news | लोकसभेच्या निवडणूकितही जेवढी रस्सीखेच होत नाही तेवढी रस्सीखेच आणि चढाओढ ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असते. किरकोळ वादविवाद काही ठिकाणी झाले असले, तरी एक ग्रामपंचायत वगळता इतर कुठेही काही अनुचित प्रकार घडला नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी येथे एका गावात मतदानाला आलेल्या मतदारावर मतदान केंद्राच्या बाहेरच चाकूसारख्या हत्याराने हल्ला करण्यात आला. तर त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या भावावरही हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा भाऊही जखमी झाला आहे.

Chhagan Bhujbal | भुजबळांची अंतरवालीतून घोषणा; अंबडमध्ये ओबीसींचा महामोर्चा

राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील ग्रामपंचायत मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मतदान केंद्राबाहेर महेश मच्छिंद्र उंडे (वय ३४, शिलेगाव) हे त्यांच्या भावासोबत मतदान केंद्राजवळ आले होते. यावेळी गावातीलच परशुराम धनाजी कोळसे या व्यक्तीने महेश उंडे यांच्यावर चाकूसारख्या धारदार हत्याराने हल्ला चढवला. या हल्ल्यात उंडे यांच्या कमरेवर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी महेश उंडे यांना वाचवण्यासाठी तयांचा भाऊ योगेश उंडे हे मध्ये आले असता, त्यांना देखील हातावर वार करून जबर जखमी केले आहे. जखमी महेश उंडे यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे डॉक्टर विशाल आमरे यांनी तत्काळ त्यांच्यावर प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे पाठवले आहे.

Breaking News | चांदवडमध्ये दुष्काळाचा आणखी एक बळी

याप्रकरणी, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गावात शांतात प्रस्थापित केली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘मतदानाला का आला’ असे म्हणत चाकूने हल्ला केला असे महेश उंडे यांनी सांगितले.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here