Murder : कॉलगर्ल समोर पैशाची उधळपट्टी करणे त्याला चांगलंच भोवल बॉयफ्रेंड सोबत संगनमत करून कॉल गर्ल्स ने त्याचा काटा काढला. पत्नी पासून विभक्त राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला कॉल गर्ल्स चा नाद जीवावर बेतला आहे. कल्याण- पडघा मार्गावर असलेल्या बापगाव गावातील मल्हारनगर भागातील एका चाळीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दोन कॉलगर्लसह त्यांच्या एक साथीदाराला अटक, केली आहे. मात्र गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.शिवानी, भारती अशी अटक केलेल्या कॉलगर्लची नावे असून संदीप पाटील असे अटक केलेल्या कॉलगर्लच्या साथीदाराचे नाव आहे. हे तिघेही उल्हासनगर मधील माणेरे गावात राहणारे आहेत.देवा रॉय (रा. गायकवाड पाडा अंबरनाथ ) असे फरार आरोपीचे नाव आहे. तर दीपक कुऱ्हाडे (वय ४२) असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीपक चार वर्षांपासून बापगाव मधील मल्हार नगर मध्ये असलेल्या एका चाळीत रहात होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी होता. तो इंटिरियरचे कामे घेण्याचा ठेकेदार होता. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून त्याची ओळख आरोपी कॉलगर्ल शिवानीसोबत झाली. स्वतःची शारीरिक भूक भागविण्यासाठी तो तिला कॉल करून घरी बोलवायचा. त्यावेळी तो तिच्यावर पैशांची उधळपट्टी करुन मद्यधुंद अवस्थेत शारीरिक भूक भागवत असत. कधी कधी दोन कॉलगर्ल घरी बोलवून दीपक दोघींशी शारीरिक संबंध ठेवत असलयाच पोलीस तपासात समोर आलंय. त्यातच काही दिवसांपूर्वी आरोपी शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केल्याने दीपक ने तिला कॉल करून शिवीगाळ केली होती. त्याचाचा राग धरून तिने साथीदार संदीप, तिची मैत्रीण कॉलगर्ल भारती आणि तिचा बॉयफ्रेड देवा यांच्याशी संगनमत करून दीपक च्या घरातील ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला.
दीपकने आरोपी शिवानीला फोन केला. ३० जूनला दोघी आरोपी कॉलगर्ल रात्रीच्या वेळी दीपकच्या घरी रिक्षाने आल्या. रात्री दोघींनी दीपकसोबत शारीरिक संबंध ठेवत त्याला दारू पाजली. व दीपक मद्याच्या दोघींचे बॉयफ्रेड गाडीवरून दीपकच्या घरी पोहचले यावेळी चौघांनी मिळून दीपकच्या डोक्यात दारूची बाटली फोडली व त्याचा धारदार चाकूने गळा चिरला. जाताना त्यांनी दीपकच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. शेवटी एकाच गाडीवरून चौघे फरार झाले.
दरम्यान, २ जुलै २०२३ रोजी दीपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आईने कल्याणला राहणाऱ्या त्याच्या विभक्त पत्नीकडे कॉल करून चौकशी केली. दीपकच्या घरी काहीतरी घडलंय का बघून ये, असे सांगितले. त्यानंतर दीपकची मुलगी बापगावला आली. तेव्हा वडील राहत असलेल्या घराला बाहेरून कडी लावलेल्याचं तिला दिसलं. कडी उघडल्यावर घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करून अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या 48 तासात या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असताना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि मृताच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करून मोबाईल लोकेशनवरून आरोपी शिवानीला उल्हासनगर मधील माणेरे गावातून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने आरोपी संदीप, देवा आणि भारती असे चौघांनी मिळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.त्यानंतर आरोपी संदीप आणि भारतीला ताब्यात घेऊन अटक केली. तर आरोपी देवा अद्यापही फरार आहे. पोलिसांनी अटक आरोपीकडून ३० हजार रुपये रोख, चाकू, आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम