Malegaon | मालेगाव शहरातील कॅम्प ज्ञानेश्वर नगर या परिसरात घरफोडी झाली. दरम्यान, चोरट्यांनी ४ लाखांचा ऐवज लंबिवला. चोरट्यांनी परशराम अहिरे यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात चोरीमारी तसेच घरफोडिची प्रकरणं वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ह्या गुणहयनवर आळा घालण्याचे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Educational news | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
अहिरे कुटुंबीय हे बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ६० हजार रुपये इतक्या किंमतीचा एलईडी टीव्ही, तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची साखळी, सोन्याची पोत, ४० हजार रुपये किंमतीचे ॲपल ह्या कंपनीचे एअरबर्ड, आणि तीन हजार रुपये किंमतीच्या सोन्याची पॉलिश असलेल्या बांगड्या असा एकूण ४ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी, घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर तसेच सहकाऱ्यांनी येथील घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Weather Updates | राज्यात या भागांत पुढील ४-५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम