Crime News | भावंडांची भांडणं प्रत्येक घरात होत असतात. पण, आपल्या भावासाठी सर्वात आधी मदतीला भाऊच धावून येत असतो. असं असलं तरी नाशिकमध्ये भावाभावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात चुलत भावानेच भावाचा खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथील ही घटना असून, या खूनाचा पोलिसांनी अगदी २४ तासात तपास करत दोघं आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ज्ञानेश्वर जनार्दन ह्याळीज असं मृत तरुणाचं नाव आहे.
Malegaon | सहानुभूतीसाठी हिरेंचा केविलवाणा प्रयत्न; भुसे समर्थकांचे टिकास्त्र
ज्ञानेश्वर हा सातत्याने त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब ह्याळीज याच्या कुटूंबावर दादागिरी करीत होता. त्याची नजर देखील संशयास्पद होती. तो जाणून बूजून कुटुंबीयांना त्रास द्यायचा, अपमान करायचा या रागातून त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब आणि त्याचा मित्र महेश यांनी ज्ञानेश्वरला जंगलात नेत. त्याला बेदम मारहाण केली.
मारहाण झालेल्या अवस्थेत ज्ञानेश्वर हा तेथेच पडून होता. या घटनेची नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पण, दवाखान्यात दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी सुरवातील अकस्मात मृत्यृची नोंद केली होती.
मात्र, पोलिसांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पुन्हा प्रकरणाचा तपास सुरु केला. गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता त्यांनी भाऊसाहेब आणि महेश यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यावेळी आपणच धारदार हत्याराने खून केल्याचे भाऊसाहेबने पोलिसांसमोर कबूल केले.
Pandharpur | कार्तिकी महापूजेचा उपमुख्यमंत्र्यांचा मान मनोज जरांगेंना..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम