Breaking news | ‘शेतकऱ्यांची थट्टा करू नका’; पीक विमा अधिकाऱ्यांना भूसेंनी झापले

0
19
Breaking news
Breaking news

Breaking news |   नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे ह्या वर्षी मोठ्या आभाळी संकटांना समोरे जात असून, यामुळे ह्या शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गारपीट झाली त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही संबंधित पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही.

पदाचं घेणंदेणं नाही

दरम्यान, या संदर्भात आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांची संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्ताची बैठक पार पडली आणि या बैठकीत पालकमंत्री हे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले होते. दरम्यान, “कापूस हे पीक विमाच्या निकषांत बसत असतानाही का घेतले नाही? गोडगोड बोलून तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करू नका. पीक विम्याचे पैसे हे तातडीने शेतकऱ्यांना वर्ग करा, आणि यासाठी निमित्त शोधू नका. मला या पदाचं काहीही घेणंदेणं नाही, आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसू”. अशा कठोर शब्दांत त्यांनी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. Breaking news

Dada Bhuse | चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंचा राऊतांना इशारा 

“शेतकऱ्यांच्या नावावर अनेक विमा कंपन्यांनी पैसे कमवलेत. तेव्हा ते शासनाला परत दिले का ? मग आता का तुम्ही शासनाच्या निधीची वाट बघताय तुमच्याकडे निधी आहे ना, त्यात जे शेतकरी पात्र आहेत त्यांना तातडीने मदत वर्ग करा. याबाबत शेतकऱ्यांची प्रतारणा खपवून घेतली जाणार नाही. तसेच कापूस हे पीक देखील समाविष्ट करण्याच्या सूचना यावेळी दादा भुसे यांनी केल्या आहेत. दरम्यान, संबंधित पीक विमा कंपनीचे अधिकारी दीक्षित यांना भुसे यांनी फैलावर घेतले आहे. Breaking news

नेमकं प्रकरण काय..?

जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गार पीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळीच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे तसेच, लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचे निर्देश केले होते.

त्यानुसार ह्या संबंधित नुकसान ग्रस्त महसूल मंडळांमधील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा रकमेची २५ टक्के रक्कम ही अग्रीम एक महिन्याच्या आतच देण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनी’ला दिलेले होते. पण, प्रत्यक्षात हे आदेश बजावून दोन महिन्यांचा काळ उलटून तरी या कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून रुपयाही मिळालेला नाही. Breaking news

Dada Bhuse| दादा भुसेंनी धाडली सुषमा अंधारेंना नोटिस…

मका, सोयाबीन, ह्या सर्व पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. ह्या वर्षात ऑगस्ट च्या शेवटीही लागवडी झाल्यात. ह्या कंपन्यांनी इन्शुरन्स करताना लहान पिकांचा विचारही केलेला नाही. त्यांनी सुरुवातीला यांनी असे संगीतलेच नव्हते की, आम्ही फक्त चारच पिकांचा समावेश करू. शेतकऱ्यांमध्ये मोठा उद्रेक सुरू झाला आहे आणि दादा भूसेंसारखे पालकमंत्री मी पहिल्यांदा पहिले की जे, शेकऱ्यांसाठी इतक्या ठामपणे आपली भूमिका मंडतात.

– हेमंत पाटील (पीक शास्त्रज्ञ )


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here